Breaking News

हिंमत असेल तर मध्यावधी निवडणुका घ्या- खा. संजय राऊत

पुणे, दि. 15, ऑक्टोबर - महाराष्ट्रातील सरकारमध्ये शिवसेना मजबुरीने सत्तेत आहे. ज्यांच्याविरोधात लढलो. त्या विरोधकांच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापन करणे म्हणजे जनतेशी गद्दारी होईल. भाजप सरकार जनतेच्या हिताचे काम करत नसल्याचे दिसत आहे. हिंमत असेलतर मध्यावधी निवडणुका घ्याव्यात. मध्यावधीला शिवसेना तयार आहे, असे शिवसेना नेते आणि पुणे विभागिय संपर्कनेते खासदार संजय राऊत यांनी  (शनिवारी) सांगितले. 
तसेच स्वबळवार लढण्याची शिवसेनेची तयारी पुर्ण झाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे संख्याबळ कायम राहणार असल्याचा विश्‍वासही, त्यांनी व्यक्त केला.खा. राऊत यांच्या उपस्थितीत चिंचवड येथे विधानसभा निहाय बैठक आज घेण्यात आली. त्यांनतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, की सरकारचा पाठींबा काढण्याचा मुहूर्त प्रसारमाध्यमांनी काढला होता. मध्यावधी निवडणुकांच्या अफवा पसरवल्या जात आहेत. कधीही निवडणुका घेतल्या तरी सामोरे जाण्यासाठी आम्ही तयार आहोत. कर्जमुक्ती झाली नाही तर राजकीय भूकंप होईल, असे वक्तव्य केले होते. आता कर्जमाफी झाली असून ती अंमलात आणावी म्हणून आम्ही भांडतो आहोत. राजकारणात शिवसेना कच्चा लिंबू नाही. सत्तेची उलथापालथ कधीही करू शकतो. लोकांच्या प्रश्‍नासाठीच सत्तेत राहून देखील आम्ही आंदोलनेकरत आहोत.
विरोधक सक्षम नाहीत म्हणून ही भूमिका घ्यावी लागत आहे, असे ते म्हणाले.यावेळी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, श्रीरंग बारणे, आमदार गौतम चाबुकस्वार, शिवसेना शहरप्रमुख राहुल कलाटे, महिला आघाडीच्या शहर संघटक सुलभाउबाळे आदी उपस्थित होते.