भारतीय महिला क्रिकेट संघात मोना ठरली पहिली बौद्ध क्रिकेटपटु
सातारा, दि. 03, ऑक्टोबर - ज्या भूमी मध्ये महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली.त्याच भूमित भारतीय महिला क्रिकेट संघात पहिली बौद्ध क्रिकेटपटु कु. मोना मेश्राम हिचा सत्कार सोहळा आज साजरा करण्यात आला.
सर्व क्षेत्रात आरक्षण आहे.पण,आतापर्यंत क्रीड़ा क्षेत्रात आरक्षण नसतानाही नागपुरच्या या नाग भूमितील कु.मोना मेश्राम या बौद्ध क्रिकेटपटु महिलेने एतिहास घडवला आहे.महिलांच्या वर्ड कप क्रिकेट स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघातून चमकदार कामगिरी करुन दाखवली होती.जागतिक दर्जाच्या क्रीड़ा पत्रकार व समीक्षक यांनी कु मोना हिच्या क्रिकेट कामगिरीचा गौरव केला.धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त कास्टट्राइब कर्मचारी महासंघ या संघटनेच्या वतीने केंद्रीय मंत्री रामदास आठवले,समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले व महासंघाचे अध्यक्ष कृष्णा इंगळे आणि मान्यवरांच्या उपस्थिति कु. मोना मेश्राम हिला रोख पंचवीस हजार रुपये व मानपत्र देण्यात आले.
कु.मोना ही गरीब कुटुंबातील असुन तिचे वडील प्रादेशिक परिवहन विभागात किरकोळ स्वरूपाचे काम करुन संसार चालवतात.महाराष्ट्रचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस हे नागपुरचे आहेत.त्यांनी याच भूमितील महिला क्रिकेटपटुला शासकीय सहकार्य करावे यासाठी मंत्री आठवले व बडोले त्यांची भेट घेणार आहेत.सातारा जिल्ह्याच्या वतीने अजित वाघमारे,प्रवीण धस्के व तथागत फाउंडेशनने कु मोना मेश्राम हिला शुभेच्या दिल्या.शिक्षण माता सावित्रीमाई फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने संधी मिळाली आहे.भविष्यात भारत देशाचे महिला क्रिकेट मध्ये नाव मोठे करण्यास भीमकन्या आघाडी वर राहील असा विश्वास क्रिकेटपटु कु.मोना मेश्राम हिने व्यक्त केला आहे.या कामगिरीबद्दल दलित सेनेचे प्रेमानंद जगताप-सायगावकर,आर.पी. आयच्या आयेशा फारुख पटनी, श्रीमती गीता लोखंडे व अनेकांनी शुभेच्या दिल्या आहेत.