जिल्ह्याच्या कामाची आंध्रात दखल, तेलंगणाचे पत्रकार सातारच्या भेटीला
सातारा, दि. 03, ऑक्टोबर - साता-याच्या जन्मदर, महिलांच्या प्रश्नांवर झालेले काम आणि घर मिळकतीवर लागलेल्या नावांची माहिती तेलंगणाच्या महिला पत्रकारांनी साता-याला भेट देवून घेतली. लेक लाडकी अभियान व गर्ल्स कौंटच्यावतीने क्रॉस लर्निंग अँड एक्स्चेंज प्रोग्रॅम आयोजित करण्यात आला होता. तेलंगणाच्या रजिता सनाका, कविता गोगुमाल आणि यशोदा वंगा या पत्रकारांसमवेत गरिमा कौर आणि अॅड. शैला जाधव उपस्थित होत्या.
या पत्रकार प्रतिनिधींनी सुरुवातीला सिव्हील हॉस्पिटल येथे प्रसूती मातांचा गौरव करून प्रातिनिधिक स्वरुपात तान्ह्या मुलीचे नामकरण पारंपरिक पद्धतीने केले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीकांत भोई, डॉ. उज्वला माने आणि पूनम साळुंखे उपस्थित होते. तद्नंतर रुग्णालयाच्या कामकाजाची माहिती घेत मुलींचा जन्मदर वाढीसाठी पिसीपीएनडीटी कायद्याची माहिती घेत कारवाई जाणून घेतली. बाल कुपोषणाबाबत देण्यात येणार्या आहार आणि सुविधांचे निरीक्षण केले. यानंतर तालुक्यातील काही निवडक गावांना भेटी देण्यात आल्या. महसूल सदरी महिलांची नावे लागल्याने त्या मालकीण झाल्याचे प्रमाण सातार्यात अधिक आहे.
गावातील सरपंच-ग्रामसेवक, महिला आणि ग्रामस्थांशी संवाद साधण्यात आला. तद्नंतर मुक्तांगणमध्ये झालेल्या कार्यक्रमात नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांशी चर्चा करून सामाजिक प्रश्नांवर घडत असलेल्या बदलांचा आढावा पत्रकार प्रतिनिधींनी जाणून घेतला. यावेळी अॅड. वर्षा देशपांडे यांनी महिलांविषयी कायदे आणि त्यावर प्रशासनाकडून अंमलबजावणी होताना सर्वसमावेशक कामाची आवश्यकता समजून सांगितली.
समाजातील सर्व घटक एकत्र आल्यास शासन योजना चांगल्या प्रकारे राबवताना योजनांचे चांगले परिणाम समोर येत असल्याचे सांगितले. यावेळी दारूबंदीसाठी काम करणा-या बायडाबाई मदने आणि गर्भलिंग निदान व गर्भपात प्रकरणी उल्लेखनीय सहभाग घेतलेल्या प्रगती पाटील यांच्या विशेष सत्कार करण्यात आला.