Breaking News

व्हॉट्सअ‍ॅप ग्राहकांना देणार ग्रुप ऑडिओ आणि व्हिडीओ कॉलिंगची सुविधा

मुंबई, दि. 24, ऑक्टोबर - व्हॉट्सअ‍ॅपने ग्राहकांसाठी नवीन सुविधा उपलब्ध केल्या आहेत. यामुळे आता व्हॉट्सअ‍ॅप वापरणा-यांना ग्रुप व्हिडीओ आणि ऑडिओ कॉलिंग करता  येणार आहे. सध्या व्हॉट्सअ‍ॅपकडून या नव्या फीचरची चाचणी सुरु आहे. त्यामुळे लवकरच हे फीचर मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. येत्या वर्षाच्या सुरुवातीला हे फीचर सादर  होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. व्हॉट्सअ‍ॅपने ग्राहकांसाठी नवे फीचर आणले आहे. यामुळे आता ग्राहक लाईव्ह लोकेशन शेअरही करू शकतात.