Breaking News

मानव विकास निर्देशांक आणि मुद्रा बँकेची सांगड घालून 25 तालुके रोजगारयुक्त तालुके करणार - मुनगंटीवार

मुंबई, दि. 24, ऑक्टोबर - मानव विकास निर्देशांक आणि मुद्रा बँक यांची सांगड घालून मानव विकास निर्देशांकात मागे असलेल्या 125 तालुक्यांपैकी 25 तालुके रोजगारयुक्त  तालुके करण्यात येणार असल्याची माहिती वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. सह्याद्री अतिथीगृहात यासंबंधी झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
राज्यात मानव विकास निर्देशांक कमी असलेल्या तालुक्यांपैकी 25 तालुक्यांमध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या मदतीने वॉर अगेंस्ट पावर्टी कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. यासाठी  नियोजन विभागात एक क्शन रुम ही तयार करण्यात येत आहे. यासाठी संयुक्त राष्ट्र संघाकडून आवश्यक असलेले मनुष्यबळ तसेच तांत्रिक सहाय्य मिळाले असून राज्य अर्थसंक ल्पात यासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या कामाला गती देण्यासाठी 20 नोव्हेंबर 2017 रोजी बँकर्स कमिटीसह सर्व संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिक ार्‍यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.