Breaking News

अ‍ॅड. कस्तुरे, हेमा शिंदे, रोकडे यांना ’ठोकळ’ विधीज्ञ पुरस्कार

सोलापूर, दि. 01, ऑक्टोबर - दिवंगत जिल्हा सरकारी वकील शंकरराव ऊर्फ अप्पासाहेब ठोकळ स्मृती विधिज्ञ पुरस्कार यंदा अ‍ॅड. जयकुमार कस्तुरे, करमाळ्याचे  अ‍ॅड. नागनाथ रोकडे आणि अ‍ॅड. हेमा शिंदे यांना जाहीर झाला. हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या अ‍ॅम्फी थिएटरमध्ये बुधवारी (ता. 4) सायंकाळी साडेपाचला वितरण  सोहळा होईल. पुरस्काराचे हे 22 वे वर्ष आहे. ज्येष्ठ विधिज्ञांसमवेत एका महिला वकिलाचा सन्मान या निमित्ताने करण्यात येतो. महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाच्या  वतीने त्याचे आयोजन केले असल्याचे उपाध्यक्ष सचिन ठोकळ यांनी सांगितले. सातार्‍याचे ज्येष्ठ विधिज्ञ धैर्यशील पाटील यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार आहे.  संस्थेच्या अध्यक्षा आणि माजी आमदार निर्मला ठोकळ अध्यक्षस्थानी असणार आहेत. बार्शीच्या राजर्षी शाहू लॉ कॉलेजचे प्राचार्य अ‍ॅड. कृष्णमूर्ती यांची प्रमुख  उपस्थिती असणार आहे. याच कार्यक्रमात विधी शाखेतील गुणवंत विद्यार्थी कीर्तीकुमार राऊत (बार्शी) आणि प्रथमेश शिंदे (पंढरपूर) यांचाही सन्मान करण्यात येणार  आहे. वकिली क्षेत्रातील मंडळींनी उपस्थित राहावे, असे आवाहन शिक्षण संस्था संचालक विजय जाधव, किशोर पाटील, अ‍ॅड. सुरेश गायकवाड, अ‍ॅड. दीपक  मैंदरकर, प्राचार्य नसीम पठाण यांनी केले आहे.