Breaking News

तयार फराळाचा आस्वाद संजय देशपांडे यांच्या स्नेहदिप केटरर्स मध्येच

सातारा, दि. 17, ऑक्टोबर - मागील 18 वर्षापासून केटरींगच्या व्यवसायात उडी घेवून दीपक उर्फ संजय देशपांडे यांनी त्यापूर्वी करत असलेल्या रिक्षा व्यवसायाला पूर्ण विराम  दिला. अल्पावधीतच सोबत चांगले आचारी व सेवकांची फळी उभारुन संजय देशपांडे यांनी खाद्य संस्कृतीत एक वेगळा ठसा  उमटवला. दरवर्षी दिवाळीच्या सणासाठी तयार केल्या  जाणार्‍या फराळातील गोड व तिखट पदार्थासाठी स्नेहदिपचे फराळाचे जिन्नस आज सातार्‍यातील शेकडो नागरिकांसाठी नेक पर्याय ठरले आहेत. वाढती महागाई आणि त्यातही  गुणवत्ता राखत केटरींगचा व्यवसाय सांभाळत देशपांडे यांनी गेली अनेक वर्षे सातारा जिल्ह्यातून जाणार्‍या पायी आषाढी वारी सोहळ्या दरम्यानच्या पोलिसांच्या ताफ्यासाठी निरा ते  फलटण दरम्यान तेथे जावून चांगले व स्वादीष्ट भोजन देण्याचा उपक्रम राबवला. मागील 2 वर्षापूर्वी सातारा येथे झालेल्या विराट विश्‍व हिंदू संमेलनाच्या भोजनाची व्यवस्था त्यांच्याक डे होती. याशिवाय जिल्ह्यामध्ये विविध शहरात होणारी शुभकार्ये, विवाह समारंभ, सेमीनार, कॉन्फरन्सेस, सर्वांना स्नेहदिप केटरर्स हा उत्कृष्ट पर्याय ठरला आहे. खास दिवाळी  सणासाठी साजूक तुपातील व रिफाईंड तेलातील बुंदी लाडू, खमंग चिवडा, फरसाण, चकली, शेव, खारी बुंदी अनारसे बालूशाही, शंकरपाळे पातळ पोहा चिवडा, नॉयलॉन चिवडा,  पालक शेव, मका चिवडा, बेसन लाडू, रवा लाडू, करंजी, पाकातील चिरोटे, साखरेचा चिरोटा असे अनेक पदार्थ तयार करुन योग्य भावात सातारकरांसाठी उपलब्ध करण्यात आले  आहेत.