Breaking News

दिवेआगर मंदिर दरोडा : पाच जणांना जन्मठेप, 5 जणांना सक्तमजुरी

अलिबाग, दि. 17, ऑक्टोबर - दिवेआगर येथील सुवर्ण गणेश मंदिर दरोड्यासह दोन खून प्रकरणी 12 आरोपींपैकी पाच जणांना आजन्म कारावास, तीन महिला आरोपींना 10 वर्षे  सक्तमजुरी व दोघांना 9 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. यातील अन्य दोघांना दोषमुक्त करण्यात आले. रायगड जिल्हा न्यायालयातील मोक्का विशेष न्यायालयाचे न्या. किशोर  पेठकर यांनी ही शिक्षा सुनावली.
रायगड जिल्ह्यातील दिवेआगर येथील गणेश मंदिरात 24 मार्च 2012 रोजी 11 लाख 20 हजार रुपयांच्या मूर्तींची चोरी झाली होती. मंदिराचे सुरक्षारक्षक महादेव घडशी व अनंत  भगत या दोघांची हत्या करण्यात आल्या. या प्रकरणी विविध गुन्ह्यांसह मोक्का अंतर्गत आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले. आज अखेर यावर अंतिम निर्णय होऊन आरोपींना  शिक्षा सुनावण्यात आली.