Breaking News

भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक भिडले

पुणे, दि. 17, ऑक्टोबर - मोबाइल कंपन्यांना रस्ते खोदाइसाठी परवानगी देण्यावरून महापालिकेच्या मुख्य सभागृहात मोठा गदारोळ झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक महेंद्र पठारे  यांनी सभागृहात बोलताना एका घटनेचा संदर्भ देत ‘भाजपचे गुंड’ असा उल्लेख केल्यामुळे सत्ताधारी भाजप व विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचे  चित्र सभागृहात पहायला मिळाले. राष्ट्रवादीच्या महेंद्र पठारे यांनी भाजपाच्या गुंडांच्या उपस्थितीत खोदाई होते असा आरोप केलाने भाजपचे नगरसेवक दीपक पोटे यांनी काही अपशब्द  काढले. त्याला विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी आक्षेप घेत जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यानंतर काही काळ सभागृहात दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली.  महापौर मुक्ता टिळक यांनी गैरशब्द कामकाजातून वगळण्याचा आदेश दिल्यानंतर कामकाज सुरळीत झाले.