संजीवनी’च्या शिरपेचात मानाचा तुरा- कोल्हे
अहमदनगर, दि. 24, ऑक्टोबर - विद्यापीठ अनुदान आयोगाच्या राष्ट्रीय मूल्यांकन व प्रमाणन परिषद, नवी दिल्ली (नॅशनल असेसमेंट अॅण्ड अक्रीडिटेशन कौन्सिल-नॅक) या स्वायत्त संस्थेने संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अनेक निकषांचे आधारे मुल्यांकन करून ए ग्रेड हा दर्जा दिला असुन या महाविद्यालयाने दर्जा व गुणवत्तेमध्ये अग्रेसर असल्याचे पुन्हा एकदा सिध्द केले आहे. नॅकच्या ए ग्रेड मुळे संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी दिली.
या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात कोल्हे यांनी म्हटले आहे, की संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या यशाबद्धल संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष व साईबाबा संस्थानचे विश्वस्त बिपीन कोल्हे, संजीवनी ग्रुपचे संस्थापक, माजी मंत्री शंकरराव कोल्हे आणि आ. स्नेहलता कोल्हे यांनी व्यवस्थापन, प्राचार्य, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन के ले. संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय ग्रामीण भागात असूनही दर्जेदार शिक्षणाचे कार्य करीत आहे. या महाविद्यालयाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची कायम संलग्नता मिळालेली असुन राष्ट्रीय प्रमाणन मंडळ, नवी दिल्ली (नॅशनल बोर्ड ऑफ अक्रीडिटेशन-एन.बी.ए.) कडूनही या महाविद्यालयाने सन 2002 पासुन सलग माणांकन प्राप्त केले आहे. संजीवनीच्या अधिपत्याखालील पालिटेक्निकला यापुर्वीच एन.बी.ए. मानांकण प्राप्त झाले असुन महाराष्ट्रात फक्त पाच पालिटेक्निक एन.बी.ए. मानांकित आहे. फार्मसी महा विद्यालयालयालाही यापुर्वीच एन.बी.ए. मानांकण व नॅक चा ए दर्जा मिळाला आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात फार थोडे अभियांत्रिकी महाविद्यालये एन.बी.ए. मानांकित व नॅक ए ग्रेड दर्जा प्राप्त आहे त्यात संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय अग्रेसर आहे. तसेच संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय संशोधन , दर्जा आणि गुणवत्तेच्या आधारे देशात 53 व्या क्रमांक ावर असल्याचे आऊटलुक मॅगेझिनच्या सर्वेक्षणातुन सिध्द झाले आहे.