Breaking News

संगमनेर - अकोले रस्त्याचे काम त्वरीत सुरु न केल्यास काँग्रेसचा रास्ता रोको

अहमदनगर, दि. 24, ऑक्टोबर -  घोटी राय महामार्गावरील अनेक खडड्यांनी प्रवाशांसाठी मोठी समस्या  असून किमान संगमनेर अकोले काम त्वरीत सुरु करा अन्यथा  मंगळवार24 ऑक्टोबर ला  रास्ता रोको करण्याचा इशारा काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे.
संगमनेर तालुका काँग्रेसच्या वतीने प्रांताधिकारी भागवत डोईफोडे यांना  निवेदन देण्यात आले. यावेळी कृषी सभापती अजय फटांगरे, जि.प.सदस्य रामहरी कातोरे, संपतराव डोंगरे,  बाळासाहेब देशमाने, नितीन हासे, राजुभाऊ वाळे, गणेश हासे , पांडुरंग पा, घुले आदि मान्यवर उपस्थित होते.
जि.प सदस्य रामहरी कातोरे म्हणाले कि, संगमनेर अकोले हा दोन्ही तालुक्यातील नागरिकांसाठी अत्यंत महत्वाचा रस्ता आहे. हा रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणेसाठी  माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात व आमदार वैभवराव पिचड यांनी पाठपुरावा केला होता. मात्र शासनाने अजूनही या कामाला सुरुवात केली नाही. सणासुदीचे दिवस , वाढती  वाहने,रस्त्यांवर पडलेली  मोठ मोठी खड्डे यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून याला संपुर्ण प्रशासन जबाबदार आहे. त्याबाबत  प्रशासनाला वारंवार लेखी व तोंडी निवेदनही देण्यात  आले होते. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी याची कुठलीही दखल घेतली नाही. या रस्त्यांची प्रलंबीत कामे तातडीने सुरु झालीच पाहिजे. अन्यथामंगळवार24 आ ॅक्टोंबरला सकाळी 9.00 वा. चिखली येथे भव्य रास्ता रोको करण्यात येईल असा खणखणीत इशाराही त्यांनी यावेळी दिला. यावेळी भाऊसाहेब हासे, तुळशीराम सिनारे, दत्तात्रय क ासार, सतीश शेटे, सिताराम देशमुख, तुळशीराम सिनारे, आण्णासाहेब कानवडे, गणेश उल्हास हासे, नवनाथ कातोरे, महेश कर्पेे, बाळासाहेब खर्डे, बादशाह वाळुंज, भास्कर सिनारे,  आत्माराम हासे, सोमनाथ भोकनळ , विक्रांत देशमुख , सागर हासे आदि मान्यवर हजर होते.