वेश्या व्यवसायातील दोघा संशयितांना कोठडी
पुणे, दि. 08, ऑक्टोबर - जुळे सोलापुरातील सावन हॉटेल, सपना लॉजमध्ये मुंबई येथून दोघा तरुणींना आणून वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडल्याबद्दल हॉटेल व्यवस्थापक एजंटलला अटक झाली होती. त्यांना मुख्य न्यायदंडाधिकारी माहेश्वरी पटवारी यांच्या न्यायालयात हजर केल्यानंतर पाच दिवस पोलिस कोठडी देण्यात आली. हॉटेल मॅनेजर रमेश रामचंद्र बोडगेवार (वय 36, रा. प्लॉट नंबर दोन, बिलालनगर, जुळे सोलापूर), एजंट हितेश हस्तीमल ओसवाल (वय 39, रा. रूम नंबर 101, स्वराली अपार्टमेंट, सार्थकनगर, वाघोली- हवेली, पुणे) याला पोलिस कोठडी मिळाली आहे.विजापूर नाका पोलिसांना दोघांना अटक करून आज न्यायालयात हजर केले होते. सरकाततर्फे अल्पना कुलकर्णी आरोपीकडून शशी कुलकर्णी प्रशांत नवगिरे या वकिलांनी काम पाहिले. ओसवाल हा अनेक शहरात हॉटेल-लॉजमध्ये एजंटाकडून तरुणी आणत होता. अनेक शहरात त्याचे जाळे आहे. ताब्यात घेतलेल्या दोघा तरुणींना तो ऑक्टोबरला सोलापुरात आणला होता. पाच तारखेला ही कारवाई झाली. जुळे सोलपुरातील उच्चभ्रू वस्तीत हे हॉटेल आहे. शिवाय मुख्य रस्त्यालगतच आहे.