क्रेडीट कार्ड चोरून 25 हजारांची फसवणूक
पुणे, दि. 08, ऑक्टोबर - ज्येष्ठ नागरिकाचे क्रेडीट कार्ड चोरून त्याव्दारे पैसे काढून 25 हजारांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार नुकताच वाकड येथे उघडकीस आला.याप्रकरणी सुरेश भुमकर (वय 67, रा. कस्पटे वस्ती, वाकड) यांनी वाकड पण्यात तक्रार दिली आहे. फिर्यादी व त्यांच्या पत्नीचे क्रेडीट कार्ड चोरून आरोपीने त्याव्दारे 24 हजार 753 रूपये काढून फसवणूक केली. वाकड पोलीस तपास करत आहेत.