कोल्हापुरातील कळंबा तुरूंगात कैद्यांना गांजा आणि मोबाईल पुरवणा-या व्यक्तीला अटक
कोल्हापूर, दि. 08, ऑक्टोबर -कोल्हापुरातील कळंबा तुरूंगात कैद्यांना गांजा आणि मोबाईल पुरवणा-या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली. लक्ष्मण मल्लापा धनगर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
कळंबा तुरूंगात मुरूम टाकण्याचे काम सुरू आहे. लक्ष्मण हा डंपर चालक असून तो तुरूंगात मुरूम टाकण्यासाठी आला होता. पोलिसांनी लक्ष्मणची झडती घेतली असून त्याच्याकडे 230 ग्रॅम गांजा आणि 3 मोबाईल सापडले. या सर्व प्रकरणामुळे कळंबा कारागृहातील सुरक्षाव्यवस्थेचा ढिसाळपणा उघडकीस आला आहे. या आधाही असा प्रकार 2015 साली उघडकीस आला होता.