Breaking News

पुण्यात तेलाचा भडका उडून हॉटेलला आग

पुणे, दि. 26, ऑक्टोबर - बिबवेवाडी-कोंढवा मार्गावरील हॉटेल खुशबूच्या स्वयंपाक घराला सकाळी पावणेआठच्या सुमारास मोठी आग लागली. या घटनेत हॉटेल खुशबूचे  स्वयंपाक घर पूर्ण जळून खाक झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावरील हॉटेल खुशबूच्या स्वयंपाकघरात तेलाचा भडका उडून आग लागली. सकाळी हॉटेलमध्ये नाश्त्याची तयारी सुरू असताना कढईमध्ये तेलाचा भडका  उडाला. अल्पावधीतच आग मोठ्या प्रमाणात पसरली. हॉटेल कर्मचार्‍यांनी अग्निशामक दलाला माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी  दाखल होत तीन गाड्यांच्या सहाय्याने आग विझवली. घटनेत हॉटेलचे संपूर्ण स्वयंपाक घर जळून खाक झाले आहे. सुदैवाने घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. ही कामगिरी कों ढवा फायर स्टेशनचे तांडेल कैलास शिंदे, ड्रायव्हर देशमुख, फायरमन रफिक शेख, सुभाष खाडे, निलेश राजीवडे, घडशी, माने, पिसाळ, अनिल सपकाळ, नवनाथ जावळे यांनी  बजावली.