Breaking News

वीज कापून शेतकर्‍याला अडचणीत आणू नका - अनिल देशमुख

नागपूर, दि. 01, नोव्हेंबर - सततची नापिकी, कर्जमाफीचा फायदा न पोहचणे, थकित असलेले तुरीचे चुकारे आणि सोयाबिनला अत्यल्प भाव अशा अनेक अडचणी शेतकर्‍यांपुढे  आहेत. या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने वीज कापून शेतकर्‍यांना अडचणीत आणू नये, अशी मागणी माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केली.
महाविरणने राज्य भरात थकीत असलेल्या शेतकर्‍यांच्या शेतातील विज कापण्याचा सपाटा सुरु केला. शेतकरी हा आज आर्थीक टंचाईत आहे. गेल्या तीन वर्षापासुन सततच्या  नापीकीने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. दुसरीकडे त्याला मदत करण्याऐवजी संकटात टाकण्याचे काम सरकार करीत असल्याचा अरोप देशमुख यांनी केला.
शासनाने खरेदी केलेल्या तुरीचे पैसे अद्याप शेतकर्‍यांना मिळालेले नाहीत. सोयाबीनला बाजारात भाव नाही, कापसाची सुध्दा तीच परीस्थीती आहे. यामुळे शेतकर्‍यांकडे पैसे नाही.  दुसरीकडे कापसाच्या पिकाला पाणी देण्याची वेळ आली आहे. गहु व चण्याची पेरणी करायची आहे. ओलीत करण्यासाठी कृषी पंपाची गरज असतांना याच काळात वीज कापणे सुरू  झाले आहे. तेव्हा राज्य सरकारने कृषी पंपाची वीज तोडणी बंद करावी. सोयाबीनचे खरेदी केंद्र त्वरीत सुरु करण्यात यावे. कापसाची सरकारी खरेदी चालु करुण गुजरात राज्याप्रमाणे  कापसाला 500 रुपये बोनस दयावे अशा प्रमुख मागण्यात देशमुख यांनी केल्या आहेत. तसेच या मागण्यसाठी राष्ट्रवादी काँग्रेस 3 नोव्हेंबर रोजी नागपूर जिल्ह्यातील काटोल येथे  आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.