Breaking News

कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळकेंच्या पाठीशी साबांतील अदृश्य शक्ती

मुख्यमंञ्यांच्या पारदर्शकतेला थेट आव्हान देण्याचा प्रमाद

दि, 12, ऑक्टोबर - मुंबई (विशेष प्रतिनिधी) भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.हे स्वामी समर्थांचे वचन व्यवाहारी जीवनात व्यक्तीगत पातळीवरही वापरात येऊ लागल्याचे मुंबई शहर  ईलाखा विभागाच्या पावणे चार कोटीच्या गैरव्यवहारात निष्पन्न होणार्या हितसंबंधातून जाणवू लागले आहे.सार्वजनिक बांधकाम मंञ्यांच्या वाढदिवसाचा केक कापण्यासाठी मुख्य संशयितांची  विशेष हजेरी आणि 6 आक्टोबरच्या राञी मनोरा आमदार निवासात जाऊन सचिव आणि अधिक्षक अभियंत्यांकडून आ.चरण वाघमारे यांना अप्रत्यक्षपणे मुख्य संशयित कार्यकारी अ भियंत्यांना वाचविण्यासाठी साबां यंञणा ठाम असल्याचे सुचित करणे या बाबी कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके यांच्या पाठीशी साबांशी संबंधित अज्ञात पण मोठी शक्ती खंबीरपणे उभी  असल्याचे दर्शवितात.
गेल्या काही दिवसापासून आधीच बदनाम असलेल्या मुंबई शहर इलाखाच्या अंतर्गत मनोरा आमदार निवास इमारतीचा गैरव्यवहार गाजतो आहे.आमदारांच्या खोल्यांमध्ये कुठलीही मंजूरी न  घेता खोट्या निविदा,खोटी वर्क आर्डर,खोटी बीले मंजूर करून तब्बल पावणे चार कोटीचा अपहार झाल्याचे प्रकरण आ.चरणभाऊ वाघमारे यांनी उघडे करून धसास लावले.चौकशी  अहवाल झाला.दोषींवर कारवाई देखील झाली .पण या कारवाईत सापत्न भाव दाखविला गेला असा नवा आरोप चौकशी अधिकारी तथा अधिक्षक अभियंत्यांच्या हेतूवर संशयाचे ढग  निर्माण करू लागला आहे.
शहर इलाखाच्या कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके यांची या गैरव्यवहारात मुख्य भुमिका असतांना त्यांच्यावर केवळ पदावनती करून बदलीची कारवाई तर दुय्यम जबाबदारी असलेल्या सहा  अभियंत्यांना निलंबनाची शिक्षा.ही बाब नैसर्गीक न्यायाला हरताळ फासणारी आहे.अर्थात याची कुणकुण कारवाई आदेशाच्या आदल्या राञी आ.चरणभाऊ वाघमारे यांना लागली होती,साबां  सचिव (रस्ते) सी.पी.जोशी आणि चौकशी अधिकारी अधिक्षक अभियंता अरविंदा सुर्यवंशी यांनी स्वतः भेटून या पक्षपाती निर्णयाचे संकेत दिले होते.
आमच्यासाठी कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके यांनी भरीव मदत केली आहे.आमच्या बाजूने न्यायालयीन कामकाजात त्या उभ्या राहील्या आहेत.आम्ही त्यांना निलंबीत केले तर आमच्या  विरूध्द साक्ष देतील .आमच्या गळ्याला फास लागेल.या शब्दात आ.वाघमारे यांच्या समोर या दोघांनी कार्यकारी अभियंत्यांच्या निलंबनावर असमर्थता दर्शवली होती.एव्हढ्या राञी अशा  प्रकारची चर्चा करण्यासाठी माझ्याकडे यायचे नाही अशा दटावणीत आ.चरणभाऊ वाघमारे यांनी त्या दोघांना हाकलले.
दुसर्या दिवशी सकाळी म्हणजे 7 आक्टोबरला राञीचा प्रकार आ.वाघमारे यांनी प्रधान सचिव (साबां) आशिष कुमार सिंह यांच्या कानावर घातला.भ्रमणध्वनी संभाषणात राञी 10.20  वा.आलेल्या जोशी आणि सुर्यवंशी यांनी प्रधान सचिवांनी पाठवल्याची बतावणी केल्याचे आमदारांनी आशिषकुमार सिंह यांना सांगीतले.त्यानंतर मुख्यमंञी आणि साबां मंञ्यांशीही चर्चा करू न हा संघटीत कटाचा,बनावट दस्त बनविण्याचा प्रकार असल्याचे निदर्शनास आणले.
एका बाजूला आ.चरणभाऊ वाघमारे दोषींच्या मुसक्या आवळल्या जाव्यात म्हणून प्रयत्न करीत असतांना शनीवारच्या सायंकाळी उशिरा निघालेल्या आदेशात मुख्य संशयित कार्यकारी अ भियंत्यांना वाचविण्याचे पुरेपूर प्रयत्न झाले.यावरून कार्यकारी अभियंत्याच्या पाठीशी मोठी शक्ती उभी असल्याची चर्चा साबांत सुरू असतानाच साबां मंञी चंद्रकांत दादा पाटील यांच्या वाढ दिवसाचा एक फोटो व्हायरल झाला.
या फोटोत पावणे चार कोटीच्या गैरव्यवहारात ज्यांच्याकडे संशयाने पाहीले जाते त्या कार्यकारी अभियंता केक कापणीच्या खाजगी सभारंभात टाळ्या वाजवून मंञी महोदयांचे अभिष्टचिंतन क रतांना दिसतात.हा केक स्वतः कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके यांनी स्वतः पदरमोड करून आणल्याची चर्चा साबांत ऐकायला मिळते.
पारदर्शक कारभाराच्या गप्पा मारणारे एक मंञी त्यिंच्याच खात्यातील गैरव्यवहाराचा आरोप असणार्या कार्यकारी अभियंत्यांचा केक भरवून वाढदिवास साजरा करण्यात स्वारस्य दाखवित  असतील तर मुख्यमंञ्यांच्या पारथर्शक कारभारावा टिका करण्यासाठी विरोधकांची गरज काय?
हा फोटो व्हायरल झाल्यानंतर भ्रष्ट कार्यकारी अभियंत्यांच्या पाठीशी उभी असलेल्या शक्तीला साबां मंञ्यांचे आशीर्वादा तर नाहीत ना असा सवाल साबांत उपस्थित झाला आहे.
मुख्यमंञ्यांना अदृश्य शक्तीचे आव्हान
कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके यांच्यावर रितसर कारवाई व्हावी आणि या प्रकरणात मोक्का,फोर्जरी आणि कटकारस्थान या कलमाखाली गुन्हे दाखल व्हावेत या मागणीसाठी आ.चरणभाऊ  वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली विदर्भातील आमदारांनी मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली .ही चर्चा सकारात्मक झाली असून मुख्यमंञ्यांनी कारवाईचे आश्‍वासन दिल्याचे  वृत्त आहे,तथापी कार्यकारी अभियंत्यांच्या पाठीशी असलेल्या अदृश्य शक्तीच्या घरभेदीपणाचे आव्हान मुख्यमंञ्यांसमोर आहे,ते कसे मोडून काढले जाते यावराच कारवाईचे भवितव्य  अवलंबून आहे.(क्रमशः)