Breaking News

लोकमंथनच्या पाठपुराव्याला यशःमनोरा आमदार निवासातील गैरव्यवहार भोवला

कार्यकारी अभियंत्यांच्या बदलीसह शाखा अभियंत्यांची निलंबन प्रक्रीया सुरू

मुंबई, दि. 06, ऑक्टोबर - मनोरा आमदार निवासात डागडूजी न करता कागदी घोडे नाचवून कोट्यवधी रूपयांचा अपहार पचविणार्या अभियंत्यांवर मंञालय पातळीवर कारवाई सुरू झाली आहे.तब्बल दोन वर्षापासून कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके आणि भ्रष्ट सहकारी अभियंत्यांच्या अनियमिततेसंदर्भात लोकमंथन पाठपुरावा करीत असून अखेर मनोरा प्रकरणाच्या निमित्ताने लोकमंथनच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
या संदर्भात सविस्तर वृत्तांत असा की,मुंबई साबां मंडळात सुरू असलेला गैरकारभार वाचकांच्या  चावडीवरून शासन प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याची मोहीम लोकमंथनने सुरू केली आहे.लोकायुक्त,राज्यपाल,मुख्यमंञी ,सार्वजनिक बांधकाम मंञी ,मुख्य सचिव,प्रधान सचिव,अतिरिक्त साबां सचिव सचिव अशा विविध पातळ्यांवर लोकमंथनचा या भ्रष्ट प्रवृत्तींविरूध्द उचित पुराव्यांसह दाद मागण्यासाठी पाठपुरावा सुरू होता.
लोकमंथनच्या या पाठपुराव्याला अखेर यश मिळाल्याचे अधिकृत वृत्त लोकमंथनच्या कार्यालयात येऊन धडकले असून मनोरा आमदार निवास प्रकरणात या भ्रष्ट प्रवृत्तींचे पितळ उघडे पडले आहे.
जुनं ते सोनं ही आपल्यासाठी सकारात्मक असलेली म्हण साबांतील भ्रष्ट प्रवृत्तीसाठी माञ दुभती गाय असते,याचा प्रत्यय दतूरखुद्द दक्षता पथकालार्(ींळसळश्ररपलश) आला आणि जुन्यातून सोनं काढू पाहणार्या या भ्रष्ट प्रवृत्तींच्या मुसक्या आवळण्याची कारवाई करणे प्रशासनला भाग पडले.
मुंबईत सध्या आकाशवाणी आणि मनोरा हे दोन आमदार निवास आहेत.राज्याच्या ग्रामिण भागातील जनतेचे प्रश्‍न मंञालयात घेऊन येणार्या लोकप्रतिनिधींना निवासाची सोय म्हणून या आमदार निवासाची व्यवस्था आहे.या आमदार निवासाच्या देखभालीसाठी दरवर्षी कोट्यावधी रूपयांची तरतूद केली जाते.तरतूद केलेला निधी खर्चही होतो.पण केवळ कागदावर.प्रत्यक्षात काम केले जातेच असे नाही.कामाच्या निविदा प्रसिध्द केल्या जातात.निविदा स्विकारया जातात.कामांचे वाटपही होते.काही ठिकाणी वरवरची डागडूजी करून उर्वरीत कामे फाट्यावर मारली जातात.इमारत जेव्हढी जुनी तेव्हढी भ्रष्ट अभियंत्यासाठी खाण सोन्यानं लडलेली.
मनोरा आमदार निवास प्रकरणात हाच फंडा वापरून कोट्यावधी रूपयांची हेराफेरी केल्याचे व्हीजीलन्सच्या निदर्शनास आल्यानंतर साबां मंञालय खडबडून जागे झाले असून संबंधित दोषींवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
मंञालय सुञांकडून मिळालेल्या अधिकृत वृत्तानुसार मुंबई साबां प्रादेशिक विभागाचे अधिक्षक अभियंता ए.बी.सुर्यवंशी यांनी कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके यांच्यावर ठपका ठेऊन त्यांची बदली करण्याची शिफारस असलेला अहवाल साबां मंञालयाला पाठविला आहे.तर शाखा अभियंता भुषण फेगडे आणि धोंडगे यांना तात्काळ निलंबीत करण्याचे आदेश मंञालयातून जारी झाल्याचेही खाञीशीर सुञांकडून समजते.दरम्यान आकाशवाणीच्या तुलनेत नवीन असलेले मनोरा आमदार निवास साबांतील भ्रष्ट प्रवृत्तींसाठी सोन्याची खाण बनल्याचे अनेक किस्से आहेत,त्यासंदर्भात तपशीलवार वृत्त ऊद्याच्या अंकात.