Breaking News

हनीप्रीत व्यवस्थेला पडलेला एक प्रश्‍न

दि. 06, ऑक्टोबर - राम रहीमची मानस कन्या हनीप्रीत तथा प्रियंका तनेजा या बहुचर्चीत संशयितेला तब्बल 38 दिवसांच्या प्रतिक्षेनंतर ताब्यात घेतले गेले.पंचकुला न्यायालयासमोर उभे केल्यानंतर हनीप्रीतला सहा दिवसांची पोलीस कोठडीही सुनावण्यात आली आहे,कायदा आणि कायद्याचे शिलेदार आपले कर्तव्य चोख बजावतात  यात शंका नाही.पण एकूणच बाबा राम रहीमच्या वादग्रस्त प्रकरणानंतर,कायद्याचे रक्षक आणि समाजाच्या नैतिकतेवर काही प्रश्‍न उपस्थित होतात.अर्थात या नैतिकतेच्या घसरणीला राम रहीम स्वतः हनीप्रीत आणि तिचा पुर्व पती विश्‍वास गुप्ता हे जबाबदार आहेत.
मुळ फत्तेहाबादची असलेली हनीप्रीत सच्चा डेरात दाखल झाल्यानंतर नैतिकतेच्या या कथेला सुरूवात होते.रामानंद आणि आशा तनेजा यांची कन्या असलेली प्रियंका तनेजा ही जन्मदाता पित्याच्या इच्छेनंतरच राम रहीमच्या सहवासात आली,फत्तेहबादची सारी संपत्ती विकून बाबाचे शिष्य असलेले रामानंद तनेजा डेरात येऊन व्यवसाय करू लागले.14 फेब्रूवारी 1999 मध्ये राम रहीमच्या साक्षीने प्रियंका तनेजा तथा हनीप्रीत विश्‍वास गुप्ताशी विवाहबध्द झाली.बाबाने हनीप्रीतला आपली तिसरी कन्या घोषीत केली.आणि पुढे हीच प्रियांका हनीप्रीत बनून राम रहीम च्या सेवेत कन्या म्हणून दाखल झाली.
बाबाला अटक होईपर्यंत हनीप्रीत आणि बाबाच्या बापलेक या नात्यावर कुठलाच आक्षेप नव्हता.निदान डेराच्या बाहेर याविषयी कुठली चर्चा नव्हती.बाबाला अटक झाली आणि हनीप्रीत प्रसिध्दीच्या झोतात आली.बापलेकीचं नातं असलेल्या उभयंतांमध्ये अनैतिक संबंध होते इथवर या प्रसिध्दीने टोक गाठले.या चर्चेचे जे स्रोत आहेत त्यात तिचा पुर्वपती विश्‍वास गुप्ताचा सिंहाचा वाटा आहे.विश्‍वास गुप्ताने स्वतः प्रसार माध्यमांशी संपर्क साधून त्या संबंधाची चिञफित सादर केल्याचा दावा केला जातो आहे.
हा विषय म्हटलं तर चर्चेचा नाही.बापलेकीच्या पविञ नात्यावर शिंतोडे उडविणारे हे वर्तन एरवी निषिध्दच.तथापी हनीप्रीत अटक झाल्यानंतर स्वतः हनीप्रीतने या नात्याच्या पाविञ्यावर आत्मविश्‍वासाने केलेले वक्तव्य चर्चेला निमंञण देत आहे.
मंगळवारी तिला अटक झाल्यानंतर एका खाजगी वृत्तवाहीनीवर तिने केलेले वक्तव्य जेव्हढे संताप आणणारे आहे तेव्हढेच दुसर्या बाजूने हनीप्रीतविषयी सहानुभूती वाटण्यास कारणीभूत ठरते.
तब्बल 38 दिवसानंतर हनीप्रीतने समोर येऊन केलेले भाष्य पश्‍चातापदग्ध आहे,डोळ्यातून ओघळणारे अश्रू मगरमच्छ के आसू आहेत असे म्हणण्यास पुरेसा वाव आहे.बापलेकीच्या नात्याला काही मंडळींनी कलंक लावला असा आरोप ती करते,पण यासाठी ती स्वतः आणि दत्तक बाप  जबाबदार आहेत हे तितक्याच साळसूदपणे विसरते.आजवर या हनीप्रीतने एकदाही आपल्या जन्मदात्या आईबापाचा उल्लेख केला नाही.दत्तक बापाविषयी एहढे आकर्षण आणि प्रेम असण्याचे कारण गुलदस्त्यात राहील्याने विश्‍वास गुप्ताच्या दाव्याला पुष्टी मिळते.कुटले अपत्य असे असते की जन्मदात्यापेक्षा दत्तक पित्याला जीवापाड जपते,ऐन तारूण्यात गुरूमित तथा बाबा राम रहीमला दत्तक गेलेली मुलगी आपल्या मुळ आईबापाने पालनपोषण केले हे कसे विसरू शकते?बाप म्हणून केवळ आणि केवळ बाबाचा जप करणे हेच प्रियंका तथा हनीप्रीतच्या बदनामीचे खरे मुळ आहे.आणि म्हणूनच इतरांवर दोषारोप लावण्याचा कुठलाच नैतिक अधिकार हनीप्रीतला नाही.
पोलीस यंञणा आणि न्यायव्यवस्था आपले काम चोख करीतषअसातांना हनीप्रीत इथेही काही प्रश्‍न उपस्थित करते.या ठिकाणी एक मुद्दा महत्वाचा आहे.गेले अडतीस दिवस हनीप्रीतला सात राज्यांचे पोलीस शोधत असल्याचा फिल्मी डायलाग समाजमाध्यमांवर फिरत होता.पोलीसांनी हनीप्रीताला अटक करून तो थांबला.पण इतके दिवस ती कुठे होती? पोलीस तिथपर्यंत का पोहचू शकले नाहीत.मझाला वेळ कुणी कशासाठी दिला?बाबाला सजा सुनावल्यानंतर तुरूंगाच्या दारापर्यंत बाबाची सोबत करणारी हनीप्रीत अचानक वाँटेड कशी झाली? संशयीत म्हणून तेंव्हाच तिला ताब्यात घेणे शक्य नव्हते का?तिच्यावर ठेवले गेलेले आरोप खरे की खोटे हे तपासण्याचे काम आहे.न्यायव्यवस्था ते चोखपणे पार पाडेलही.पण हनीप्रीत सध्या तरी एकूण व्यवस्थेसमोर एक प्रश्‍नचिन्ह बनृले आहे हे माञ नक्की.