अथक प्रयत्नानंतर बूचर बेटावरील आग आटोक्यात
मुंबई, दि. 09, ऑक्टोबर - बूचर बेटावर लागलेली आग मोठ्या अथक प्रयत्नानंतर आटोक्यात आली आहे. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला तब्बल तीन दिवस लागले. शुक्रवारी संध्याकाळी बूचर बेटावरील तेलटाक्यांना आग लागली. बीपीसीएलच्या 13 क्रमांकाच्या टाकीला आग ही लागल्याचे समजते. मात्र, यानंतर आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे आजूबाजूच्या ही टाक्यांही तापू लागल्या होत्या. या आगीमुळे आत्तापर्यंत 200 कोटी रूपयांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. या घटनेत आत्तापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. 200 अग्निशामक दलाचे जवान ही आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करत होते.