बारमधील 44 हजाराची रक्कम चोरली; दोघे अटक
फिर्यादी हे वडगावशेरीतील गणेशनगर येथील प्यॉपुलर कंट्री लिकर बार या देशी दारुच्या
दुकानात काम करतात. आरोपींनी त्यांना व त्यांचा सहकारी योगेश अगरवाल यांना हाताने ढकलून दुकानाच्या गल्ल्यातील रोख 44 हजार 800 रुपये जबरदस्तीने चोरुन नेले. यासंदर्भात चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती. यावेळी पोलिसांना त्यांच्या खबर्यामार्फत आरोपींची माहिती मिळाली होती. त्यानुसार, आरोपींना पकडण्यात आले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक नामदे तपास करत आहेत.