Breaking News

खरवंडी ग्रामपंचायत सरपंचपदी अर्चना पंडित

अहमदनगर, दि. 19, ऑक्टोबर - तालुक्यातील महत्त्वाच्या समजल्या जाना-या खरवंडी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी अर्चना देविदास पंडित यांची बिनविरोध निवड करण्यात  आली. अर्चना पंडित यांचा एकच  अर्ज  आल्याने हि निवडणूक बिनविरोध झाल्याचे निवडणूक  आधिकारी जोशी यांनी जाहीर केले. या निवडीमुळे खरवंडीच्या इतिहासात प्रधमच धनगर समाजाला सरपंच पदाची संधी मिळाली आहे. 
गेल्या   दोन वर्षापुर्वी अत्यंत अटीतटीच्या झालेल्या निवडणूकीत सहा पॅनेलमधुन पंधरा सदस्य निवडून  आल्यानंतर सरपंच पदासाठी मोठी चूरस निर्माण झाली होती. अशावेळी अजित फाटके, विजय फाटके व मेजर  अरूण फाटके यानी तीन पॅनलचे विजयी उमेदवार तसेच सुवर्णा भोगे यांना  एकत्र करून सत्ता स्धापनेचा निर्णय  घेतला.  त्यावेळी ठरल्याप्रमाणे पाच वर्षात तिन महीलांना सरपंच पद व पाच सदस्यांना उपसरपंचपद देण्यात येत  असल्याने माजी  सरपंच वंदना फाटके यांनी राजीनामा दिल्याने.पडित यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी निवडणूक  आधिकारी म्हणून व्हि.के. जोशी यांनी काम पाहीले.तर कामगार तलाठी जायभाय डि. एस.व ग्रामविकास आधिकारी जाधव के.बी.यांनी सहकार्य केले.या बिनविरोध निवडीसाठी माजी उपसरपंच  अजित फाटके, त्रिवेनेश्‍वर पाणीवापर संस्धेचे चेअरमन  आबासाहेब फाटके, भाऊसाहेब कु-हे यांनी विषेश सहकार्य केले. यावेळी मुळाचे शेतकी आधिकारी विजय फाटके, मुकूद भोगे, दत्तात्रय पडित, सतिश भोगे, राहुल भोगे, बहिरू नेब, उपसरपंच सुभाष मिसाळ, माजी उपसरपंच सौ.रंजना भोगे, सदस्य मंगल शिंदे, श्रीमती विजया पावले. भाऊसाहेब शिदे देविदास पंडित, बाळासाहेब कु-हे, नानासाहेब फटके, दिलीप भोंगे, अमोल पागमल् आदी उपस्थिती होते.बिनविरोध निवडीबद्दल पंचायत समिती सभापती सौ.सुनिताताई गडाख, प.स.सदस्य कल्पना पंडित, माजी सरपंच सिद्धार्थ भोगे, संत ज्ञानेश्‍वरचे चेअरमन प्रा.नाथाभाउ पडित, आदीनी अभिनंदन केले.