Breaking News

मुद्रा योजनेचा लाभ घेऊन स्वाभिमानाने जगा - प्रकाश जावडेकर

पुणे, दि. 17, ऑक्टोबर - मुद्रा योजनेच्या माध्यमातून लाखो तरुण स्वयंरोजगाराकडे वळत आहेत. या योजनेमध्ये कुठल्याही प्रकारचे भांडवल लागत नसल्यामुळे तरुणांना याचा  मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. त्यामुळे तरुणांनी या योजनेचा लाभ घेऊन रोजगार मिळविण्यापेक्षा रोजगारनिर्मिती करून स्वाभिमानाने जगावे, असे प्रतिपादन केंद्रीय मानव  संसाधन मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले.
राज्यस्तरीय बँकर्स समिती महाराष्ट्र राज्य तसेच जिल्हा प्रशासन पुणे आयोजित ॠमुद्रा प्रोत्साहन अभियानॠ, बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे ते बोलत होते. यावेळी सर्व बँकेच्या वतीने  विविध प्रकारच्या योजनांबद्दल माहिती देण्यासाठी 38 स्टॉल्स लावले होते. त्याद्वारे नागरिकांना मुद्रा योजनेविषयी माहिती तसेच रजिस्ट्रेशन करून देण्यात आले. कार्यक्रमात बचत  गटाच्या माध्यमातून स्वयंरोजगार करणार्‍या महिलांना कर्जवाटप करण्यात आले. सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गतच्या लाभार्थ्यांना धनादेश देण्यात आला. तसेच मुद्रा योजनेअंतर्गत  मंजूर तरुणांना मंजुरी प्रमाणपत्र देण्यात आले. ‘मुद्रा यशोगाथा’ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच उपस्थित लाभार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
शासनाच्या विविध योजनाप्रमाणेच मुद्रा योजना ही अत्यंत महत्वाकांक्षी योजना आहे. यामधून मोठ्या प्रमाणात उद्योजक तयार व्हावेत हा सरकारचा मुख्य उद्देश आहे. कुठल्याही प्रक ारचे तारण नसल्यामुळे लाभार्थ्याला याद्वारे कर्ज मिळवणे सोपे जाते. सामान्य लोकांना डोळ्यासमोर ठेवून ही योजना राबविण्यात येत आहे. 4 कोटी तरुणांचा पूर्वी कुठल्याही प्रक ारचा व्यवसाय नसताना त्यांनी मुद्रा योजनेच्या साहाय्याने व्यवसायात उडी घेतली आहे. मुद्रा योजनेच्या मदतीने सावकाराच्या जाळ्यातून मुक्तता होईल. मुद्रा योजना ही  स्वयंरोजगाराचे नवे दालन आहे. ॠनव्या भारताची नवी आकांक्षा, नवी योजना मुद्रा योजनाॠ अशी माहिती श्री. जावडेकर यांनी दिली.