किल्ले अजिंक्य ता-यावर जाणा-या रस्त्यावर दरड कोसळली
सातारा, १० ऑक्टोबर - :किल्ले अा-यावर जाणा-या रस्त्यावर आज दरड कोसळली. ही बाब सकाळी फिरायला जाणा-या नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. दरडीचे दगड मोठे असल्याने ते रस्त्यातून बाजूला घेताना अडचणी येत होत्या. अजिंक्यतारा किल्ल्यावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. त्यातील हा एक प्रमुख़ मार्ग आहे. या परिसरात नागरिकांची वस्ती मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांच्यामध्ये भितीचे वातावरण निर्माण जाले आहे.