Breaking News

सेंट्रल पब्लिक स्कूलचे विद्यार्थी सीबीएसई नॅशनल अँरोबिक्स स्पर्धेकरीता रवाना

बुलडाणा, दि. 27, ऑक्टोबर - ध. दि. रहाटे शिक्षण व बहुउद्देशिय संस्थेअंतर्गत सेंट्रल पब्लीक स्कुल मेहकरचे विद्यार्थी पंजाब येथे होणार्‍या सिबीएसई नॅशनल अ‍ॅरोबिक्स स्पर्धेक रिता रवाना होत आहेत. ही स्पर्धा 25 ऑक्टोंबर ते 29 ऑक्टोंबरपर्यंत होणार आहे. 
यामध्ये फिटनेट अँरोबिक्समधून वर्ग 10 वीच्या विद्यार्थीनी अवनित निकस, आदिती ताजणे, अपुर्वा पाटील, साक्षी मोरे, संयुक्ता खारोडे, साक्षी बोडखे, शिखा सावजी, र्शृती मुदळकर  आणि स्पोर्ट अँरोबिक्स या प्रकारात सचिन गायकवाड वर्ग 10 वी वैष्णवी आव्हाळे वर्ग 8 हे सर्व विद्यार्थी स्पध्रेमध्ये सहभागी झालेले आहे. या क्रीडा प्रकारांसाठी विद्यार्थ्यांमध्ये  अतोनात मेहनत व जिद्दीची गरज असते. ती मेहनत करताना योग्य मार्गदर्शन तसेच योग्य दिशेची आवश्यकता असते. तेच कार्यशाळेचे प्राचार्य गजानन निकस अतिशय उत्तम प्रकारे  विद्यार्थ्यांमध्ये घडवून आणत आहेत. विद्यार्थ्यांचे कोच असलेले सुनिता बोडखे, अर्चना गवई व क्रिडा शिक्षक अमित चहारे, संतोष भुसारी यांचा विद्यार्थ्यांच्या अँरोबिक्स सारख्या  नवीन क्रीडा प्रकाराला आपल्या ग्रामीण भागातून राष्ट्रीय स्तरावर नेण्यात सिंहाचा वाटा आहे.
आपल्या संस्थेच्या विद्यार्थ्यांना मेहनत करून उच्च स्तरावर नेण्यासाठी संस्थापक अध्यक्ष खा. प्रतापराव जाधव हे नेहमीच विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करत असतात, संस्थेचे सचिव ऋषी  जाधव, डॉ. सचिन जाध्व, गणपत रहाटे, शाळेचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी ऐन दिवाळीनंतर होणार्‍या  या राष्ट्रीय स्पर्धेसाठी खेळाडू विद्यार्थ्यांना जिंकुन आपल्या शाळेचे नाव  उज्वल करण्याच्या शुभेच्छा दिल्या.