Breaking News

अ‍ॅट्रॉसिटी चित्रपटातून समाजातील वास्तवाचे दर्शन

औरंगाबाद, दि. 17, ऑक्टोबर - अ‍ॅट्रॉसिटी या आगामी मराठी सिनेमातूनही आजच्या समाजातील ज्वलंत वास्तव पाहायला मिळणार आहे असे प्रतिपादन अ‍ॅट्रासिटी चित्रपटाचे  दिग्दर्शक दीपक कदम यांनी केले. या चित्रपटाचा पोस्टर अनावरण सोहळा नुकताच हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध लेखक— दिग्दर्शक दिलीप शुक्ला यांच्या हस्ते दिमाखात संपन्न झाला.  या चित्रपटाला मन:पूर्वक शुभेच्छा देत लेखक-दिग्दर्शक दिलीप शुक्ला म्हणाले की, आशयाच्या बाबतीत मराठी चित्रपट कायमच मला आवडत आला असून ‘अ‍ॅट्रॉसिटी’च्या निमित्ताने  एक मह्त्त्वपूर्ण विषय रसिकांसमोर येत असल्याचा मला आनंद आहे. आजवर नेहमीच दैनंदिन जीवनातील मुद्द्यांवर प्रकाशझोत टाकत चित्रपट बनवणार्या दिग्दर्शक दिपक कदम यांनी  ‘अ‍ॅट्रॉसिटी’चं दिग्दर्शन केलं आहे. आर. पी. प्रोडक्शनची प्रस्तुती असलेला ‘अ‍ॅट्रॉसिटी’ 12 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.