Breaking News

अगस्ति कारखान्याचा उद्या बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ

अकोले, दि. 09, ऑक्टोबर - अगस्ति सहकारी साखर कारखान्याचा सन 2017 - 18 चा गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ मंगळवार दि. 10  ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता होणार असल्याची माहिती अगस्ति कारखान्याचे उपाध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम पाटील गायकर यांनी दिली.
अगस्ति कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदिपण समारंभ आ. वैभवराव पिचड यांच्या हस्ते व कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष मधुकरराव पिचड यांच्या अध्यक्षतेखाली  होणार आहे. अगस्ति कारखान्याने राज्यात आदर्श निर्माण केला असून कारखान्याची वाटचाल यशस्विपणे सुरु आहे. कारखाना सुरु करण्यासाठी सर्व कामे पुर्ण  झालेली असून सर्व यंत्रणा कार्यरत आहे.
दीपावलीनंतर कारखान्याचा हंगाम सुरु होणार असल्याचे अगस्तीचे कार्यकारी संचालक भास्करराव घुले यांनी सांगितले.
तसेच अगस्ति साखर कारखान्याकडून दीपावली निमित्ताने साखर वाटप करण्यात  येणार असून गळीत हंगाम 2016-17 मध्ये कार्यक्षेत्रातील शेतकर्‍यांनी गळीतास  पुरविलेल्या ऊसावर वीस रुपये दराने देण्यात येणार आहे. शेतकर्‍यांनी येताना ओळखपत्र आणावे. दि. 11 व 12 रोजी अकोले, कळस गट, दि. 13 व 14 इंदोरी,  वीरगाव, दि. 15 व 16 ला आगर व कोतूळ गटाला साखर वाटप केली जाणार असल्याचे श्री. घुले यांनी सांगितले.
यावेळी प्रकाश मालुंजकर, मीनानाथ पांडे, गुलाबराव शेवाळे, रामनाथ वाकचौरे, कचरु पा. शेटे, अशोक देशमुख, राजेंद्र डावरे, अशोक आरोटे, मच्छिंद्र धुमाळ,  महेश नवले, भाऊसाहेब देशमुख, सुनील दातीर, भास्कर बिन्नर, सुरेखाताई देशमुख, मनिषा येवले, भिमसेन ताजणे, सुरेश गडाख आदी उपस्थित राहणार असून या  बॉयलर अग्निप्रदिपण समारंभ कार्यक्रमासाठी सर्व सभासद, ऊस उत्पादक व शेतकरी बांधवांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्री. घुले यांनी केले.