आ. एकनाथ खडसे सुदैवाने अपघातातून बचावले
जळगाव, १० ऑक्टोबर - जिल्ह्यातील माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या ताफ्यातील पायलट व्हॅनला अपघात झाल्याची घटना कोथळी बायपासजवळ रविवारी रात्री ८.३० वाजता घडली. या अपघातात तीन जण जखमी झाले. सुदैवाने खडसे यांचे वाहन अपघात स्थळापासून ५०० मीटर अंतरावर होते.
जळगाव येथून आपले नियोजित कार्यक्रम आटपून माजी मंत्री खडसे यांचा ताफा मुक्ताईनगरकडे येत होता. कोथळी बायपासजवळ मलकापूरकडून येणाऱ्या ट्रकने (क्र. आर.जे.०४ जी.ए.५५६७)ने ताफ्यातील पायलट व्हॅनला (क्र.एमएच.१९ बी.जे.७३१४) धडक दिली.
त्यामुळे पायलट व्हॅन चक्काचूर झाली. अपघातात वाहनचालक ज्ञानेश्वर महाजन, हवालदार शशिकांत निकम, हवालदार दिनेश ढवळे हे जखमी झाले. अपघातानंतर खडसे यांनी जखमींना १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून जळगावला रवाना केले. बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, कोथळीचे उपसरपंच संजय चौधरी, सालबर्डीचे सरपंच तुषार राणे, रोहित जंगले, हवालदार लिलाधर माळी, हवालदार रमेश मोरे यांनीही घटनास्थळी धाव घेऊन मदत केली. घटनास्थळी डीवायएसपी सुभाष नेवे, पोलीस उपनिरीक्षक सचिन इंगळे, हवालदार चंद्रकांत पाटील यांनी धाव घेतली.