Breaking News

काँग्रेसचे संजय लोंढे यांचे नगरसेवक पद रद्द

अहमदनगर, दि. 31, ऑक्टोबर - जून 2015 मध्ये झालेल्या अहमदनगरच्या महापौर निवडणुकीत सभागृहात गैरहजर राहून पक्षादेशाचे उल्लंघन केले व विरोधी शिवसेना  उमेदवाराला मदत करण्याचा आरोप असलेले काँग्रेसचे नगरसेवक संजय लोंढे यांचे नगरसेवक पद रद्द करण्याचा आदेश नाशिकचे विभागीय आयुक्त यांनी दिला आहे.
अहमदनगरचे तत्कालीन महापौर संग्राम जगताप यांनी राजीनामा दिल्यानंतर महापालिकेमध्ये 8 जून 2015 रोजी नूतन महापौरांची निवड करण्यासाठी विशेष सभेचे आयोजन क रण्यात आले होते.या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी चे अभिषेक कळमकर व शिवसेनेचे सचिन जाधव उमेदवार होते.महापौर निवडणुकीसाठी सर्वच राजक ीय पक्षांनी आपल्या नगरसेवकांना पक्षादेश(व्हिप)जारी केले होते.मात्र तरीदेखील काँग्रेस चे नगरसेवक संजय लोंढे यांनी सभागृहात गैरहजर राहून विरोधी शिवसेनेच्या उमेदवाराला  मदत केल्याचा आरोप करीत माजी महापौर व काँग्रेसचे गटनेता संदीप कोतकर यांनी लोंढे यांचे नगरसेवक पद रद्द करण्याच्या मागणीसाठी नाशिक विभागीय आयुक्तांकडे याचिका  दाखल केली होती.आजारी असल्याचे कारण देऊन सभेला गैरहजर असल्याचे लोंढे यांनी सांगितले होते.त्याकरिता आजारी असल्याने भिवंडी येथील एका खासगी रूग्णालयात अ‍ॅड मिनट असल्याचे प्रमाणपत्र लोंढे यांनी सादर केले होते.या याचिकेची सुनावणी नाशिक येथे विभागीय आयुक्तांसमोर 9 व 26 अक्तूबरला झाली.सुनावणीच्या वेळी लोंढे यांनी भिवंडीच्या  खासगी रूग्णालयाची दोन वेगवेगळी प्रमाणपत्रे का सादर केली याचा योग्य खुलासा करू शकले नाहीत.त्यामुळे लोंढे यांचे वर्तन शंका निर्माण करणारे असल्याचे कारण देऊन नाशिक  विभागीय आयुक्तांनी लोंढे यांचे नगरसेवक पद रद्द करण्याचा आदेश दिला आहे.