Breaking News

कुसुंबा येथे घरफोडी; 65 हजारांचा ऐवज लांबविला

जळगाव, दि. 31, ऑक्टोबर - जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी किशोर शिवाजी पाटील या चालकाच्या घराच्या दरवाजाचे कुलुप  तोडून कपाटातील 13 हजार रुपये रोख व दागिने असा 65 हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल  करण्यात आला आहे.
किशोर पाटील यांचे घर गेल्या दहा दिवसापासून घर बंदच होते. शेजारी मामाकडे असताना शेजारच्या लोकांनी घर उघडे असून दरवाजाचे कुलुप तुटले असल्याची माहिती दिली.
लॉकरमध्ये ठेवलेले 20 हजार रुपये किमतीची 12 ग्रॅमची सोन्याची साखळी, 24 हजार रुपये किमतीचे 10 ग्रॅमचे कानातील टॉप व 4 ग्रॅमची अंगठी, 10 हजार रुपये किमतीची 5  गॅमची अंगठी व 13 हजार रुपये रोख असा ऐवज चोरट्यांनी लांबविला आहे. सहायक पोलीस निरीक्षक समाधान पाटील, भरत लिंगायत व अन्य सहका-यांनी घटनास्थळी भेट देऊ न पंचनामा केला. ठसे तज्ज्ञ व श्‍वान पथकानेही घटनास्थळाची पाहणी करुन नमुने घेतले.याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे .