Breaking News

धुळे-सुरत महामार्गावर बसला अपघातात एक ठार, 12 जखमी

धुळे, दि. 31, ऑक्टोबर - नवापूर- धुळे- सुरत महामार्गावरील घोळदे गावाजवळ एसटी बस आणि कारची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात एक जण ठार  झाला असून 12 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर साक्री ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मिळालेली माहितीनुसार, घोळदे गावाजवळ समोरून येणा-या भरधार कारने धुळे-बडोदा एसटी बसला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, बस समोर जावून  रस्त्यावर उलटली. या अपघातात एकाचा जागेवरच मृत्यू झाला तर जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात बस व चारचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. महामार्गावरच बस  उलटल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. कार चालक नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथील आहे.