Breaking News

निराधारांचे धनादेश बँकेत जमा होण्यास विलंब

औरंगाबाद, दि. 22, ऑक्टोबर - केवळ चेकबुक नसल्यामुळे संजय निराधारा योजनेचा लाभ घेणार्या निराधारांचे धनादेश बँकेत जमा करण्यास उशीर झाला  आहे. 7 हजार 185 निराधार वयोवृध्दांचे सुमारे 43 लाखांचे धनादेश बँकेत वेळेवर जमा न करता आल्याने निराधारांना दिवाळी अंधारात काढावी लागली.
पैठण तालुक्यात संजय गांधी, श्रावणबाळ, इंदिरा गांधी, निराधार योजनेचे सुमारे 7 हजार 185 लाभार्थी असून अनुदान केवळ चेकबुक नसल्याचे कारणाने  बँकेत जमा झाली नाही. सध्या बँकेवर विविध प्रकारचे अनुदान, कर्जमाफी जमा करण्याचा भार येऊन पडलेला असल्याने तहसील कार्यालयाने बँकेत  ऑगस्ट महिन्याचे जमा केलेले निराधारांचे अनुदान त्यांच्या खात्यावर जमा केले नाही. निराधारांना ऑगस्ट महिन्याचे अनुदान बँके मार्फत वाटप झाले नाही  तर सप्टेंबर महिन्याचे धनादेश बँकेत जमा करण्यास उशीर झाल्याचे समजले.