रस्ता लुटणारे तिघे पोलीसांच्या ताब्यात
अहमदनगर, दि. 03, ऑक्टोबर - मोहटादेवीचे दर्शन घेवुन परतणा-या दांपत्याला धाक दाखवुन धायतडकवाडी शिवारात रस्त्यावर लुटणा-या तिघापैंकी एका आरोपीला स्थानिक नागरीक व फिर्यादीने पकडुन पोलिसांच्या ताब्यात दिले. अटक केलल्या मोसीम बन्सी शेख (वय-18 वर्षे,रा.अकोला ) याला येथील न्यायाधीश डॉ.दत्तराज पटवे यांनी दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.यामधील दोन आरोपी फरार झाले आहेत.रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कैलास कुंडलीक शिंदे रा.दैठण ता.आष्टी,जिल्हा. बीड हे पत्नीसह मोटारसायकवरुन मोहटादेवी वरुन पाथर्डीकडे येत होते.धायतडकवाडी शिवारात तिघांनी शिंदे यांची मोटारसायकल अडविली.रस्त्यावर अडवुन धाक दाखवुन कैलास शिंदे यांच्या खिशातील रोख तेराशे रुपये काढुन घेतले.त्यांच्या पत्नीच्या अंगावरील सोन्याचे मणिमंगळसुत्र हिसकावले. यावेळी शिंदे व त्यांच्या पत्नीने आरडाओरड केली.रस्त्याने येणारे जाणारे व स्थानिक नागरीक धावले.तिघांचा पाठलाग केला.
अंधाराचा फायदा घेवुन दोघेजण फरार झाले.मोसीम शेख याला कैलास शिंदे व ग्रामस्थांनी पकडले.पोलिसांच्या ताब्यात दिले.पोलिसांनी शिंदे यांच्या फिर्यादीवरुन मोसीम शेख,सचिन बारगजे रा.अकोला,ज्ञानेश्वर धायतडक, रा. धायतडकवाडी यांच्या विरु्दध रस्ता अडवुन लुट केल्याचा गुन्हा नोंदविला आहे.मोसीम शेख याला तपाशी अधिकारी पोलिस हवालदार प्रकाश बारवकर न्यायालयासमोर सोमवारी हजर केले.न्यायाधीश डॉ. दत्तराज पटवे यांनी शेख याला चार आक्टोंबर 2017 पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.पोलिस सचिन बारगजे व ज्ञानेश्वर धायतडक यांचा शोध घेत आहेत.