Breaking News

पावसाने शेतकर्‍यांचे अर्थकारण बदलून टाकले

।  माजी आमदार नरेंद्र घुले यांचे प्रतिपादन । धूत कापूस जिनींगचा उत्साहात शुभारंभ

अहमदनगर, दि. 03, ऑक्टोबर - तालुक्याची दुष्काळी ओळख पुसुन शेतक-यांनी पांढरे सोने पिकवणारा तालूका अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. यंदा  पावसामुळे शेतकर्‍यांचे अर्थकारण बदलुनन टाकणारे हे पिक अडचणीत आले आहे. त्यामुळे त्याचा फटका शेतकर्‍यांना बसणार आहे.  याचा विचार शासनापासुन  शेवटच्या घटकापर्यंत करण्याची गरज असून शेतक-यांना न्याय मिळवून देण्यासाठी अधिकाधिक भाव देण्याचा प्रयत्न करावा असे प्रतिपादन माजी आमदार नरेंद्र घुले  यांनी केले. 
शेवगाव येथील नेवासे रस्त्यावरील धुत जिनींगमध्ये कापुस खरेदीस माजी आ. घुले यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. अध्यस्थानावरुन ते बोलत होते. यावेळी  राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अरुण लांडे, ज्ञानेश्‍वरचे संचालक काकासाहेब नरवडे, बाजार समितीचे सभापती रामनाथ राजपुरे, उपसभापती विष्णुपंत बोडखे,  नगरसेवक सागर फडके, नंदकुमार सारडा, कल्याण नेमाणे, भगवान धुत, पुरुषोत्तम धुत आदी प्रमुख उपस्थित होते.
घुले म्हणाले की, सध्या शेतक-यांना सरकारच्या धोरणामुळे विविध समस्यांचा सामना करावा लागत असून उदयोग धार्जिण्या सरकारने शेतक-यांकडे दुर्लक्ष केल्यास  भविष्यात त्याचे परिणाम सर्वांनाच भोगावे लागतील. शेवगाव हे कापासाचे आगार असून येथील शेतकरी ऊस पिकाकडून कापसाकडे वळले आहेत. त्यामुळे राज्यात  शेवगाव कापुस उत्पादनात आग्रेसर आहे. कपासाची मोठया प्रमाणात लागवड होत असल्याने 14 जिनींग, 11 आँल मील, दोन तेल प्रक्रीया उदयोग येथे सुरु आहेत.  यामुळे परिसरात उदयोग व रोजगार निर्माण झाला आहे.
यावेळी जिनिंग कारखानदार बाळसाहेब सोनवणे यांनी कापसाला सतत आग लागत असून येथे काही उपाय योजना नाही. तरी बाजार समिती किंवा नगरपरिषदेने  अग्निशमन वाहनाची सोय करावी अशी मागणी केली. त्याला जगदीश धुत यांनी अनुमोदन दिले.
यावेळी शेतकरी बाजार समितीचे सचिव मुदस्सर शेख, अप्पासाहेब मडके, रमेश बडधे, सुदाम झाडे, किशोर दारकुंडे, रोहीदास कांबळे यांच्यासह व्यापारी व हमाल  मोठया संख्यने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्तविक पुष्कर धुत यांनी तर सुत्रसंचालन जगदीश धुत यांनी केले. तर ओमप्रकाश धुत यांनी आभार मानले.