Breaking News

कल्याणमध्ये येवल्याच्या पैठणीचे पहिले शोरुम; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

कल्याण, दि. 05, ऑक्टोबर - येवल्याची पैठणी ही आता कल्याण-डोंबिवलीतही सहजरीत्या उपलब्ध होणार आहे. कल्याण (प) येथील शिवाजी चौक येथे इमेज  शोरुमच्या समोर पैठणी अ‍ॅण्ड सिल्क सारीज या शोरुमचे उद्घाटन ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार  पडले. यावेळी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे महापौर राजेंद्र देवळेकर आणि अन्य उपस्थित होते. त्यावेळी कल्याण-डोंबिवलीकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी  केली होती. भारतीय संस्कृतीत पैठणीला अन्ययसाधारण महत्त्व आहे. पैठणीमुळे येवल्याचे नाव आज खर्या अर्थाने सातासमुद्रापार पोहचले आहे.