Breaking News

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने महाआरोग्य शिबीर संपन्न

ठाणे, दि. 05, ऑक्टोबर - राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त झडपोली येथे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे  यांच्या माध्यमातून महाआरोग्य शिबीर आयोजित करण्यात आली होते.
कोणताही रुग्ण उपचार झाला नाही म्हणून दगाऊ नये हे ध्येय निलेश सांबरे यांनी समोर ठेवून भगवान महादेव सांबरे रुग्णालय तयार केले आणि जनतेच्या अखंड व  मोफत सेवेकरिता ते अविरत सुरू आहे. या हॉस्पिटलच्या व भक्तीवेदांत रुग्णालयाच्या माध्यमातून सदर महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या  शिबिरास ठाणे-पालघर-पामगड परिसर व ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. ठाणे-पालघर-ठाणे-पालघर-पामगड जिह्यातील सुमारे 4739  गरजूंनी या शिबिराचा लाभ घेतला. या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे 1300 स्त्रियांना मोफत कॅन्सर प्रतिबंधकलस देण्यात आली. त्याबरोबर शल्यचिकित्सक,  नेत्रचिकित्सक, महिला रोगतज्ञ, बालरोगतज्ञ, अस्थिरोगतज्ञ, कॅन्सरतज्ञ, आयुर्वेद तज्ञ तसेच मोफतइसीजी, मोफत रक्त तपासणी व एमजेपीजेएवाय योजनेंतर्गत मोफत  शस्त्राक्रिया इत्यादी विविध वैद्यकीय सुविधा या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून गरजूंना देण्यात आल्या. तसेच रुग्णांना येण्या-जाण्याकरिता वाहतूक व्यवस्था तसेच  अल्पोपहाराची व्यवस्था संस्थेच्या माध्यमातून करण्यात आली होती.