Breaking News

अहिल्याबाई होळकर पास योजनेचा 640 मुलींना लाभ

औरंगाबाद, दि. 05, ऑक्टोबर - ग्रामीण भागातील मुलींना शिक्षण मिळावे तसेच त्या शिक्षणापासून वंचित राहू नये, त्यांना लांब पल्ल्याच्या शाळेत  जाण्या-येण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने अहिल्याबाई होळकर मोफत पास योजना सुरू केली आहे. गेल्या नऊ महिन्याच्या कार्यकाळात या अभिनव योजनेचा  जवळपास 640 ठाामीण भागातील विद्यार्थिनींनी लाभ घेतला, अशी माहिती मध्यवर्ती बसस्थानकाचे डेपो मॅनेजर कृष्णा मुंजाळ यांनी दिली. गेल्या नऊ महिन्याच्या  कालावधीत मोफत पासपासून आठ लाख 32 हजार 860 रुपयांची मुलींच्या पालकांची बचत झाली आहे. अहिल्याबाई होळकर मोफत पाससाठी दिली जाणारी रक्कम  शासनाच्या तिजोरीतून राज्य परिवहन महामंडळाला दिली जाते. मासिक पास योजनेबरोबरच सुटीच्या कालावधीत विद्यार्थ्याना मूळगावी जाण्या-येण्यासाठी सवलत  देण्यात येते. या योजनेचा जवळपास 13 हजार 597 विद्यार्थ्यानी लाभ घेतला.