Breaking News

एल्फिन्स्टन दुर्घटना : हळदणकर कुटुंबाला आ. सुनील शिंदेंकडून आर्थिक मदत

मुंबई, दि. 05, ऑक्टोबर - एल्फिन्स्टन दुघर्टनेत जीव गमावलेल्या वरळीतील मयुरेश हळदणकर याच्या कुटुंबाला शिवसेनेचे स्थानिक आमदार सुनील शिंदे यांनी  आज आर्थिक मदत केली. शिंदे यांनी त्यांच्या घरी जाऊन हळदणकर कुटुंबाला भेट दिली आणि 1 लाखांचा धनादेश सुपूर्द केला. हळदणकर कुटुंबात मयुरेश हा  कमवता सदस्य होता. त्याच्या मृत्यूनंतर कुटुंबाचे प्रचंड हाल होत असल्याचे प्रसारमाध्यमांनीही दाखवले होते. त्याची दखल घेत कुटुंबियांना मदतीचा ओघ सुरू आला  आहे.
मयुरेशच्या लहान बहिणीला रेल्वेत नोकरी देण्यात यावी. पण, रेल्वेत शक्य न झाल्यास तिला किमान सरकारी सेवेत रूजू करून घेण्यात यावे, अशी मागणीही या  वेळी आ. सुनील शिंदे यांनी केली.