Breaking News

भूमीगत गटार योजनेचा प्रमुख सिद्दीकी निलंबित

औरंगाबाद, दि. 05, ऑक्टोबर - शहरातील भूमीगत गटार योजनेचे काम करणार्या कंत्राटदार खिल्लारी इन्फ्रास्टक्चर या कंपनीच्या कामावर देखरेख करणार्या फोर  प्रेस कंपनीला काळ्या यादीत टाकून या कामाचे प्रकल्प प्रमुख श्री. अफसर सिद्दीकी यांना निलंबित करण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या स्थायी समितीने  याबाबत शिफारस केली होती. केंद्र शासनाने दिलेल्या 454 कोटी अनुदानातून हे काम करण्यात येत होते. मात्र कंत्राटदाराने यात भ्रष्टाचार व अनियमितता केल्या  तसेच नियंत्रण ठेवणारी कंपनी आणि मनपा अधिकार्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे या प्रकारे कारवाई करावी अशी शिफारस स्थायी समिती बैठकीत करण्यात  आली होती. या बैठकीत राजू वैद्य, राजगौरव वानखेडे, कीर्ती शिंदे, मनिषा मुंडे, आदींनी या विषयाचा पाठपुरावा केला होता. मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर या  बैठकीत अनुपस्थित राहिल्याबद्दल सदस्यांनी सभापती गजानन बारवाल यांच्याकडे नाराजी व्यक्त केली.