Breaking News

बीडीडी चाळीत 560 रहिवाशांची अखेरची दिवाळी

मुंबई, दि. 13, ऑक्टोबर - बीडीडी पुनर्विकास योजनेअंतर्गत ना. म. जोशी मार्ग येथील 560 रहिवाशांच्या पात्रता निश्‍चितीसाठीचा बायोमेट्रिक सर्व्हे जिल्हाधिकार्‍यांकडून पूर्ण झाला  आहे. त्यामुळे आता रहिवाशांची अंतिम पात्रता निश्‍चिती झाल्यानंतर या रहिवाशांशी दहा दिवसांत करार करण्यात येणार आहे. त्यानंतर 560 रहिवाशांना संक्रमण शिबिरात स्थलांतरीत  करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 
ना. म. जोशी आणि नायगाव बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाला सुरुवात झाली असून लवकरच वरळीच्या पुनर्विकासालाही सुरुवात होणार आहे. सर्व्हे पूर्ण झाल्याने आता ना. म.  जोशीमधील 560 रहिवाशांच्या पात्रता निश्‍चितीचे काम वेगात सुरू असून पात्र रहिवाशांची यादी लवकरच मुंबई मंडळाला सादर करण्यात येणार आहे. त्यानुसार दिवाळीनंतर, म्हणजे  येत्या पंधरा ते वीस दिवसांत या रहिवाशांना जवळच्या संक्रमण शिबिरात हलवण्यात येणार आहे.