Breaking News

अभाविपचे 52 वे कोकण प्रदेश संमेलन यावर्षी डिसेंबरमध्ये रत्नागिरीत

रत्नागिरी, दि. 03, ऑक्टोबर - शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात छात्रशक्तीच्या माध्यमातून गेली 69 वर्षे काम करणार्‍या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे 52 वे  महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन यावर्षी रत्नागिरीत होणार आहे. अभाविपचे कोकण प्रदेश अध्यक्ष प्रा. डॉ. वरदराज बापट, उपाध्यक्ष प्रा. श्रीकांत दुदगीकर आणि रत्नागिरी  शहर सहमंत्री साईजित शिवलकर आणि शहर मंत्री श्रीजित वेलणकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
अभाविपला शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वाचे स्थान आहे. विविध आंदोलने, चर्चेच्या माध्यमातून शैक्षणिक समस्या सोडविण्याचे व विद्यार्थ्यांना एक दिशा देण्याचे काम  अभाविपने केले आहे. सामाजिक क्षेत्रातील विद्यार्थी परिषदेचे योगदान मोलाचे आहे. अभाविप दरवर्षी विविध जिल्ह्यांमध्ये अधिवेशन करत असते. या वर्षीचे 52 वे  अधिवेशन 27 ते 29 डिसेंबर या कालावधीत रत्नागिरीत होणार आहे. या अधिवेशनासाठी कोकण भागातून एक हजार विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. 1985 नंतर  32 वर्षांनी अधिवेशन रत्नागिरीत होत आहे.
नवीन विद्यापीठ कायदा तसेच राष्ट्रीय शिक्षण धोरण, विद्यापीठ उपकेंद्र समस्या यासंदर्भात अधिवेशनात चर्चासत्र होणार आहे. महिला सुरक्षा, विद्यार्थ्यांची आत्महत्या  अशा विविध शैक्षणिक, सामाजिक समस्यांवर चर्चाही होईल. विद्यर्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व सामाजिक संदेश देण्यासाठी अनुभवकथन, सांकृतिक कार्यक्रम व  शोभायात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे. नव्या वर्षाच्या कोकण प्रदेश कार्यकारिणीची निवड यावेळी होणार आहे.