Breaking News

पुण्यातील 5 तरुण रत्नागिरीत बुडाले; चौघांना वाचवण्यात यश

रत्नागिरी, दि. 02, ऑस्टोबर - पुण्याहून पर्यटनासाठी आलेले पाच तरुण येथील आरे-वारे खाडीत बुडाल्याची घटना आज सायंकाळी 6.15 वाजताच्या सुमारास  घडली. यामधील अनंत गुडी, पंकज सिंग, विकास पटेल व अन्य एक अशा चार जणांना वाचवण्यात ग्रामस्थांना यश आले. मात्र अनुज सिंग परिहार हा तरुण अद्याप  बेपत्ता असल्याचे समजते.
आज सायंकाळी हे तरुण फिरण्यासाठी येथे आले होते. किना-यावर फिरून झाल्यानंतर ते पोहण्यासाठी खाडीत उतरले. सायंकाळी भरतीची वेळ होती. मात्र या पाच  जणांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. स्थानिक ग्रामस्थांनी हे पाहिल्यावर त्यांना वाचवण्यासाठी सरसावले. चार जणांना बाहेर काढण्यात यश आले. मात्र  पाणी पोटात गेल्यामुळे यातील काही जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल विभूते घटनास्थळी आले. अंधार झाल्याने शोध कार्यात अडथळे येत होते.