Breaking News

कोल्हापुरात मोहरमच्या मिरवणुकीत बस घुसून 2 ठार ; 5 जखमी

कोल्हापूर, दि. 02, ऑस्टोबर - कोल्हापूरमधील गंगावेश भागात मोहरमच्या मिरवणुकीत कोल्हापूर महानगर परिवहनची (केएमटी) बस घुसून झालेल्या अपघातात 2  जण ठार तर 5 जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर संतप्त झालेल्या जमावाने ती बस पेटवून देण्याचा प्रयत्न केला. जमावाने बसवर जोरदार दगडफेक केली .  जमावाने अग्निशामक दलाच्या गाडीवरही दगडफेक केली . शहरातील ताबूतांची विसर्जन मिरवणूक पंचगंगा नदीकडे निघाली होती . त्याच वेळी पापाची तिकटी भागात  गंगावेशीकडे जात असलेल्या केएमटी च्या बसचे ब्रेक निकामी झाले . या ठिकाणी तीव्र उतार असल्याने बस थेट मिरवणुकीत घुसली . या अपघातानंतर परिसरातील  वातावरण तणावपूर्ण बनले आहे .