Breaking News

एकता रिटेल किराणा मर्चंट सोसायटीतर्फे 40 लाखांच्या 200 रुपये नोटांचे वाटप

जळगाव, दि. 18, ऑक्टोबर - धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर आज एकता रिटेल किराणा मर्चंट नागरी सोसायटीच्या माध्यमातून नागरिकांना 200 रुपयाच्या नव्या नोटांचे वाटप क रण्यात आले. रिझर्व बँकेने प्रथमच या नोटा चलनात आणल्या असून जळगावकरांना त्या एकता रिटेल किराणा मर्चंट सोसायटीकडून उपलब्ध करुन देण्यात आल्या.
या नोटा वाटपास प्रमुख पाहुणे म्हणून मिलींद कुळकर्णी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते 10 जणांना नोटा देण्यात आल्या. सोसायटीचे अध्यक्ष ललित बरडीया यांनी स्वागत केले. त्यांनी  रिझर्व बँकेच्या सहकार्याबद्दल आभार मानले. श्री. कुळकर्णी यांनी सोसायटीतर्फे राबविण्यात येणार्‍या सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले.त्यानंतर दिवसभरात सुमारे 700 ते 800  ग्राहकांना 40 लाखांच्या नोटांचे वाटप झाले.
या कार्यक्रमास सोसायटीचे उपाध्यक्ष घनश्यामदास आडवाणी, सीईओ सौ. प्रणिता कोलते, जवहरीलाल राका, राजू अहुजा, सुरेश पाटील, सचिन छाजेड, दयानंद कटारीया, मनोज  झाबक उपस्थित होते. सूत्रसंचालन स्मिता वाणी यांनी केले. प्रविण कोतकर, राधिका ठाकूर देसाई, हर्षा कुळकर्णी, किरण माहेश्‍वरी, हर्षाली देवरे, प्राजक्ता अवचार, कल्पना पाटील,  नितीन पाटील, सुभाष साळुंखे व किसन कदम यांनी सहकार्य केले.