Breaking News

आधार कार्डसाठी 38 केंद्रात सोय

सोलापूर, दि. 22, ऑक्टोबर - सोलापूर शहरातील25 टक्के नागरिकांकडे अजूनही आधार कार्ड नाहीत. त्यांना आधार कार्ड काढता यावे, यासाठी  महापालिकेच्या वतीने 38 ठिकाणी केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. कार्यालयीन वेळेत केंद्रावर जाऊन कार्ड काढता येणार आहे. या सर्व ठिकाणी  कार्यालयीन वेळेत आधार कार्ड काढता येईल. आधार कार्डातील बदल करता येणार आहे, अशी माहिती महापालिका उपायुक्त त्रिंबक ढेगळे-पाटील यांनी  दिली. शहरातील 75 टक्के नागरिकांकडे आधार कार्ड असून, 25 टक्के नागरिकांना कार्ड काढता यावे, म्हणून ही सेवा महापालिकेच्या वतीने करण्यात येत  आहे. यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. शांतीनगर, महा ई-सेवा केंद्र कुंभारवेस, विजयनगर, फुरडे कॉम्पलेक्स दमाणीनगर, उत्तर  सोलापूर तहसील, एमआयडीसी, नेहरूनगर, किसान संकुल, हत्तुरेनगर, कोंडी, न्यू बुधवार पेठ, पाथरुढ चौक, गरिबी हटाव झोपडपट्टी क्रमांक 2, संगमेश्‍वर  कॉम्प्लेक्स मोदी, मदर इंडिया झोपडपट्टी, सिद्धेश्‍वरनगर नई जिंदगी, जय भवानी प्रशाला, गोदुताई घरकुल, दत्तनगर, सोरेगाव, संतोषनगर, मुरारजी पेठ,  सिद्धेश्‍वर पेठ, राजेंद्र चौक, शास्त्री चौक, विजापूर नाका, देगाव, अशोक चौक, मनपा शाळा रविवार पेठ, नीलमनगर, अरविंधधाम रोड, विडी घरकुल.