Breaking News

राष्ट्रीय पत्रकारिता कल्याण न्यासाच्या पुरस्कारांचे सोमवारी वितरण

मुंबई, दि. 22, ऑक्टोबर - राष्ट्रीय पत्रकारिता कल्याण न्यास तर्फे सोमवार 23 ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ पत्रकार नंदकिशोर त्रिखा आणि रजत शर्मा यांना  त्यांच्या पत्रकारितेतील योगदानाबद्दल पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे . राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह भय्याजी जोशी आणि अर्थमंत्री  सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे . 
नंदकिशोर त्रिखा हे हिंदी पत्रकारितेतील ज्येष्ठ व्यक्तिमत्व असून त्यांनी नवभारत टाईम्स च्या लखनौ आवृत्तीचे संपादक म्हणून काम पाहिले आहे . लंडनच्या  द टाईम्स च्या थॉमसन फाऊंडेशन च्या पाठयवृत्तीसाठी निवड झाली होती .
रजत शर्मा हे हिंदी वृत्त वाहिन्यांमधील अग्रगण्य पत्रकार म्हणून ओळखले जातात. झी वाहिनीवर त्यांचा आप की अदालत हा कार्यक्रम मोठा लोकप्रिय ठरला  होता . पत्रकारितेतील योगदानाबद्दल 2015 मध्ये त्यांचा पद्मभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला .  चर्चगेट येथील इंडियन मर्चंट्स चेम्बरच्या सभागृहात  होणार्‍या या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन पत्रकारिता कल्याण न्यासाचे अध्यक्ष रवींद्र संघवी आणि स्वागत समितीचे अध्यक्ष प्रबोध ठक्कर यांनी  केले आहे .