दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी लाखो रुपयाची आर्थिक उलाढाल
अहमदनगर, दि. 15, ऑक्टोबर - बुधवारी उत्साहात प्रारंभ झाल्यानंतर चौथ्या दिवशी आज शनिवारी हजरेच्या भरगच्च कार्यक्रमानंतर सांगता झालीउत्सवकाळात हजारो भाविकांनी दर्शन घेतले तर काळात लाखो रुपयाची आर्थिक उलाढाल झाल्याचा अंदाज आहे यंदापावसामुळे यात्रेकरूना फटका बसला गेलाबोधेगावचे ग्रामदैवत श्री साध्वी बन्नोमा यात्रा उत्सव बुधवारी संदलची चादर चढवून यात्रेस सुरवात झालीपरंपरेनुसार विविध धार्मिक कार्यक्रमाचे यात्रा पंचकमेटीने आयोजन केले होते सलग चार दिवस चालणार्या उत्सवातपरिसरासह राज्यभरातून भाविक दाखल होऊन त्यांनी दर्शनाचा लाभ घेतला आहे उत्सव काळात हजारो भाविकांनीचादर अर्पण करून आपल्या नवसाची फेड केली, यात्रेनिमित्त भरणारा घोड्याचा बाजार प्रसिद्ध असल्याने यंदा मोठ्याप्रमाणात आवक झाल्याने खरेदी-विक्रीचे व्यवहार चांगल्या प्रमाणात झाले. यात्रा उत्सवात पानफुले प्रसादालय, मिठाई, स्टेशनरीच्या दुकानासोबत करमणुकीसाठी रहाटपाळणे, मौत का कुवा इत्यादी व्यवसाईकासह यात्रेत लाकडी गृहुपयोगीवस्तू व हातमागावरील लोकरीच्या घोंगड्याची चांगली विक्री झाली शुक्रवारी कुस्त्याचा जंगी हगामा पारपडला नामवंत मल्लांनी हजेरी लावली होती शेवटी कुस्ती लक्षवेधी ठरली गेली, शुक्रवारी रात्री दर्ग्यात शकीला बानोऔरंगाबाद यांचा कव्वालीचा शानदार मुक ाबलाचा कार्यक्रम झाला आहे राज्यातील नामवंत तमाशा कलावंत मंगलाबनसोडे, आरती नाशिककर, तुकाराम खेडकर-पांडुरंग मुळे, आनंद लोकनाट्य मालती इनामदार आदि तमाशाकलावंतांनी कला सादर केलीकेदारेश्वरचे अध्यक्ष प्रतापराव ढाकणे, पंचायत समितीचे सभापती क्षितिज घुले, बाजार समितीचे सभापती रामनाथराजपुरे, जिप सदस्या संगिता दुसंगे, जिप सदस्या हर्षदा काकडे यांच्यासह असंख्य राजकीय सामाजिक कार्यकर्ते वशासकीय अधिकारी यांनी यात्रा उत्सवात हजेरी लावून चादर अर्पण करून आपल्या नवसाची पूर्ती केली, शनिवारीयात्रेत आलेल्या विविध ग्रामीण लोककलावंताचा हजेरयाचा कार्यक्रम दर्ग्यात संपन्न झाला त्यामध्ये तमाशा कलावंतमालती इनामदार यांच्यासह असंख्य कलाक ारांनी आपली कला सादर केली त्यांना यात्रा पंचकमेटीच्या वतीने पान सुपारी व बिदागी दिलीयंदा ऊसतोडणीसाठी जाणारा कामगार गावीच असल्याने ग्रामीण भागातील या यात्रा उत्सवात दर्शनासाठी लाखोभाविक दाखल झाल्याने परिसरातील सर्वच रस्ते गर्दीने फुलून गेले होते यात्रा उत्सवकाळात चार दिवसात लाखोरुपयाची आर्थिक उलाढाल झाली. यात्रौत्सवात राज्यभरातून हजारो भाविक दाखल झाले होते यात्रा उत्सव यशस्वीपणेपार पडण्यासाठी बन्नोमा यात्रा पंचकमेटीने व ग्रामस्थांनी विशेष प्रयत्न केल्याने शांततेत यात्रा उत्सव पार पडला.