Breaking News

31 ऑक्टोबर रोजी सातारा शहरातील मुख्य रस्त्यांवरुन पोलीस संचलन

सातारा, दि. 29, ऑक्टोबर - सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्ताने 31 ऑक्टोबर या दिवशी राष्ट्रीय एकता दिवस तसेच स्व. इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रीय  संकल्प दिवस साजरा करण्यात येतो. या निमित्ताने पोलीस विभागाच्या वतीने सातारा शहरातील मुख्य रस्त्यांवरुन पोलीस संचलनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती  पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली आहे.
31 ऑक्टोबर रोजी पोलीस मुख्यालय सातारा येथे राष्ट्रध्वजास सलामी व 4.30 वाजता रुटमार्च करण्यात येणार आहे. हा रुटमार्च पोलीस मुख्यालय सातारा - पोवई नाका -  नगरपालिका- कमानी हौद-मोती चौक-शेटे चौक- मुख्यालय या मार्गे काढण्यात येणार आहे. या रुटमार्चमध्ये राष्ट्रीयध्वज पार्टी, पोलीस प्लॉटुन्स- 1 ,2 ,3 , 4, बॅन्ड पथक, एन.  सी .सी . प्लॉटुन्स, होमगार्ड प्लॉटुन्स, डॉग युनिट, वज्र वाहन, जलद कृती दल, निर्भया पथक यांचा समावेश राहील. पथकाने रुटमार्च केल्यानंतर पुन्हा पोलीस मुख्यालय, सातारा  येथे येतील व राष्ट्रध्वजास सलामी देतील व रिट्रीट झाल्यानंतर या कार्यक्रमाची सांगता होईल, असेही पोलीस अधीक्षक पाटील यांनी कळविले आहे.