Breaking News

सुविधा नसलेली क, ड वर्गातील 29 बालगृहे बंद करणार

औरंगाबाद, दि. 29, ऑक्टोबर - बालकांना सुविधा न देणारी क आणि ड वर्गातील 29 बालगृहे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचा फटका अनेकांना बसणार आहे.  औरंगाबाद शहरात शासकीय 3 तर खाजगी संस्थामार्फत 26 अशी 29 बालगृहे आहेत. या सर्व बालगृहांना शासनाच्या वतीने अनुदान मिळते. शासन दरवर्षी बालगृहांची पाहणी करुन  त्यांना दर्जा देत असते. हा दर्जा बालगृहातील बालकांना मिळणा-या सोयी-सुविधांवर ठरत असतो. क आणि ड वर्गात असलेल्या बालगृहात सोयी-सुविधांचा अभाव दिसून आला.  त्यामुळे शासनाने हा निर्णय घेतला आहेत. आता या दोन वर्गात राहणा-या बालकांना इतर सोयी-सुविधा असलेल्या बालगृहात वर्ग करता येईल, असे जिल्हा व महिला बाल विकास  अधिकारी तृप्ती ढेरे यांनी सांगितले.