Breaking News

नगर जिल्ह्यात 27 शेतकर्‍यांनाच कर्जमाफी

अहमदनगर, दि. 18, ऑक्टोबर - कर्जाफीसाठी अर्ज केलेल्या अहमदनगरमधील केवळ 27 शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. यातील दोन जणांना बुधवारी मुंबईत  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. तर उर्वरित 25 जणांना पालकमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात कर्जमाफी दिली जाणार  आहे.
राम शिंदे यांनी पारदर्शक आणि खर्‍या लाभार्थींना लाभ मिळण्यासाठी निकष लावल्याचा दावा केला आहे. मात्र 18 तारखेचा मुहूर्त जाहीर करत सरकारने मोजक्याच शेतकर्‍यांना क र्जमाफी जाहीर केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उर्वरित शेतकर्‍यांची दिवाळी कडूच असणार आहे. जिल्ह्यातील तब्बल 3 लाख 90 हजार शेतकर्‍यांनी कर्जमाफीसाठी अर्ज केले.  मात्र सरकारने केवळ 27 शेतकर्‍यांचीच दिवाळी गोड केली. उर्वरित शेतकर्‍यांना कधी आणि किती कर्जमाफी होणार, हा प्रश्‍न अनुत्तरीतच आहे. उर्वरीत अनेक शेतकरी अपात्र  ठरण्याची शक्यता आहे.